आतापर्यंत तुम्ही जुळे किंवा तिळे मुलांबाबत ऐकलं असेल पण कॅलिफोर्नियामध्ये नेटली सुलेमानने 2009 मध्ये एकसोबत 8 मुलांना जन्म दिला होता. यानंतर ती खूपच प्रसिद्ध झाली होती. टीव्ही चॅनल, चॅट शो आणि रेडिओ शो मध्ये नेटलीचा उल्लेख होऊ लागला.
नेटली म्हणते की, माझ्याकडे काम नव्हतं. ज्यामुळे मुलांचा सांभाळ करणं कठीण झालं होतं. आजूबाजूचे लोक वाईट बोलू लागले त्यामुळे मानसिक त्रास झाला. 14 मुलांची आई नेटलीने पॉर्न फिल्ममध्ये देखील याआधी काम केले होते. पण मुलं झाल्यानंतर तिने हे काम सोडून दिलं.