निळ्या डोळ्यांचे लोक मद्यपी होण्याची शक्यता अधिक

गुरूवार, 8 ऑक्टोबर 2015 (14:31 IST)
ज्या लोकांचे डोळे निळे असतात ते आपल्या आयुष्यात मद्यपी होण्याची शक्यता अधिक असते, असे एका नव्या संशोधनातून दिसून आले आहे. अमेरिकेतील व्हर्मोंट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांचा रंग आणि मद्यपान यांचा थेट संबंध जोडणारे हे अशा प्रकारचे पहिलेच संशोधन आहे. एर्व्हीस सुलोवरी नावाच्या संशोधकाने याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अल्कोहोलशी संबंधित वैद्यकीय चाचण्या करीत असताना एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांचा रंगही निदान करण्यासाठी उपयोगात आणला जाऊ शकेल, असे या संशोधनावरून दिसते. निळ्या डोळ्यांच्या लोकांमध्ये मद्यपानाची आवड अधिक असू शकते. त्या खालोखाल हिरवट, करड्या आणि तपकरीरी रंगाचे डोळे असलेले लोक मद्यपी बनू शकतात. गडद तपकीरी डोळ्यांच्या लोकांच्या तुलनेत या लोकांना मद्यपानाची  आवड अधिक असते, असे दिसून आले आहे. 

वेबदुनिया वर वाचा