दोन समुद्राचे मिलन आणि वेगळेपण

गुरूवार, 25 ऑगस्ट 2016 (14:44 IST)
दोन समुद्राचे मिलन म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याची पर्वणीच आहे. हेच सौंदर्य तुम्हाला अलास्काच्या खाडीत पाहण्यास मिळते. येथे दोन्ही समुद्राच्या पाण्यातील असलेला ङ्खरक स्पष्ट दिसतो. यामुळेच एक सुंदर दृश्यही पाहण्यास मिळते. येथील विशेष म्हणजे, दोन समुद्रातील पाणी एकत्र मिसळल्यानंतरही यातील फरक स्पष्ट ओळखता येतो. यामुळे हे ठिकाण प्रसिद्ध आहे. याचे आश्चर्य म्हणजे दोन ठिकाणचे पाणी एकत्र न मिसळता ते आपआपला रंग वेगळाच ठेवते. ग्लेशियरहून आलेल्या पाण्याचा रंग लाईट निळा असून नद्याकडून आलेल्या पाण्याचा रंग डार्क निळा आहे. या दोन्ही पाण्यावर अनेक संशोधनेही झाली आहेत.

वेबदुनिया वर वाचा