तणावग्रस्त मुले होतात लठ्ठ

बुधवार, 15 एप्रिल 2015 (14:07 IST)
पालकांसाठी आपल्या मुलांची काळजी घेण्यास मदत करणारी एक बातमी आहे. जर मुलांचे बालपण कौटुंबिक ताण-तणावातून जात असेल तर अठरा वर्षे वय होईपर्यंत मुलांना लठ्ठपणा येऊ शकतो. एका अभ्यासाद्वारे संशोधकांनी हा इशारा दिला आहे.

ह्युस्टन विद्यापीठातील संशोधकांच्या माहितीनुसार तीन विशेष प्रकारचे तणाव दीर्घ काळापर्यंत राहणे आणि मुलांना अठरा वर्षापर्यंत लठ्ठपणा येणे यामध्ये संबंध असल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेमध्ये नॅशनल लोंगिटय़ूडनल स्टडी ऑफ यूथच्या आकडेवारीच्या साहाय्याने सहायक प्रोफेसर डाफनी हर्नाडिस यांनी कौटुंबिक भांडण, आर्थिक दबाव आणि आईचे स्वास्थ्य याचा अभ्यास केला. तसेच 4700पेक्षा अधिक युवकांचे परीक्षण केले. या अभ्यासासाठी 1975 ते 1990 मध्ये जन्मलेल्या मुलांचा समावेश आहे. या अभ्यासातून त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे.

डाफनी यांनी सांगितले की, कौटुंबिक तणाव, आर्थिक दबाव यांची जाणीव मुलांना वारंवार होणे, आणि मुलांना अठरा वर्षाचे होईपर्यंत लठ्ठपणा येणे, यामध्ये परस्पर संबंध आहे.

वेबदुनिया वर वाचा