टीप देण्यात मुंबईकर आघाडीवर

बुधवार, 9 जुलै 2014 (17:18 IST)
हॉटेलमध्ये वेटर्सना टीप देण्यात यंदा देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत 10 टक्क्याने कपात झाली असून याबाबत मुंबईने सर्वाधिक आघाडी घेतली असल्याचे एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे.

यावर्षी जेव्हा भारतीय सुटीमध्ये परदेश दौर्‍यावर होते तेव्हा या टीपचे प्रमाण भरपूर म्हणजे 30.7 टक्क्यांपर्यंत होते. मात्र 2013 पासून एका वर्षात टीपचे प्रमाण 97 टक्क्यांवरून 87 टक्क्यांवर घसरले आहे. याबाबत ट्रीप अँडव्हाझर कंट्री मॅनेजर निखील गंजू यांनी दिलेल माहितीनुसार, हॉटेलच्या बिलासमवेत आजकाल टीप देण्याचा ट्रेंड वाढत आहे. जर बिलात सेवा कराचा समावेश करण्यात आला असेल तर 60 टक्के ग्राहक हे टीप देत नाहीत.

याबाबत टीप देणार्‍या भारतातील तसेच परदेशातील 2 हजार भारतीय ग्राहकांबाबत अलीकडेच सर्वेक्षण करण्यात आले. सुमारे 45.7 टक्के  ग्राहक हे काम टीप देत असतात तर 42 टक्के ग्राहक हे मिळणार्‍या सेवेवरच्या टीपबाबत निर्णय घेतात, असेही सर्वेक्षणात समोर आले आहे. अनेक हॉटेल्स तसेच रेस्टॉरंटमध्ये मदतीच्यादृष्टीने दिलेली सेवा हीच ग्राहकांना टीप्स देण्यास प्रवृत्त करत असते, असेही या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. टीप देणार्‍या शहरांमध्ये देशाची राजधानी असलेल्या दिल्लीचा सर्वात शेवटी क्रमांक लागत असून मुंबईने अलीकडेच यासंदर्भात चेन्नईला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे. जेव्हा भारतीय परदेशात असतात तेव्हा टीप देण्याचे प्रमाण जास्त असते. याचे कारण म्हणजे 56 टक्के ग्राहकांना परदेशांमध्ये टीप देण्याची पध्दतच आहे असे वाटते.

वेबदुनिया वर वाचा