झाडा-झुडपांमध्येही असते वैर

वनस्पतींमधील चेतना पशुपक्ष्यांइतकी उन्नत नसली तरी ती थक्क करणारीही असू शकते. आता तर एका नव्या संशोधनात असे दिसून आले आहे की, झाडाझुडपांमध्येही चक्क शत्रुत्वाची भावना असते! 
 
उत्तराखंडमध्ये तसेच हिमालयातील अन्य काही भागांत अशा काही झाडांचा आणि बीजांचा शोध लावण्यात आला आहे, जे अन्य वनस्पतींना आपल्या शेजारी वाढू देत नाहीत. या झाडांमध्ये तीन विदेशी जाती असून, एक देशी आहे. अशाच काही वनस्पतींनी साल वृक्षांच्या जंगलातही आपले अस्तित्व वाढवले आहे. त्यांच्यामधील विषारी रसायनांमुळे साल वृक्षांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे या वनस्पती तेथून हटवण्याची मोहीम सुरू आहे. 
 
वन अनुसंधान संस्थेच्या संशोधकांनी साल वृक्षांचे नुकसान करणार्‍या अशा चार वनस्पतींना हेरून ठेवले आहे. त्यामध्ये आर्डिशिया, लँटाना, यूपीटोरियम, एजीलेटम या वनस्पतींचा समावेश आहे. या वनस्पती ‘एलीलो’ नावाचे विषारी रसायन सोडतात. त्यामुळे अन्य वनस्पतींचे बीज किंवा मुळे तग धरू शकत नाहीत.

वेबदुनिया वर वाचा