कलाम यांचे 10 प्रेरणादायी विचार

मंगळवार, 28 जुलै 2015 (12:42 IST)
* स्वप्ने साकार करण्यासाठी ते बघावे लागतील. 


 
स्वप्न ते नाही जे तुम्ही झोपेत पाहता, स्वप्न ते आहे ज्यामुळे तुम्ही झोपू शकत नाही.

* माणसाला अडचण असणे आवश्यक आहे कारण यशाचा आनंद घेण्यासाठी याची गरज आहे.



* देशातील सर्वोत्तम मेंदू, आपल्याला वर्गातील सर्वात शेवटल्या बेंचवर मिळू शकतात.

* रोज सकाळी स्वत: ला या पाच गोष्टी सांगा:
1. मी सर्वोत्तम आहे.
2. मी हे करू शकतो.
3. देव नेहमीच माझ्यासोबत आहे.
4. मी विजेता आहे.
5. आजचा दिवस माझा दिवस आहे.


 
 
जर आम्ही मुक्त नाही तर कोणीही आम्हाला मान देणार नाही.

* वाट पहाणार्‍यांना फक्त तेवढंच मिळतं जेवढं प्रयत्न करणारे सोडून देतात.


 
स्वाभिमान आत्मनिर्भरता सह येतो.

मी नेहमी हे खरं स्वीकारण्यास तयार होतो की मी काही गोष्टी बदलू शकत नाही.


 
* चला आपण आपल्या वर्तमानाचा बलिदान देऊ ज्याने आमच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकेल.

वेबदुनिया वर वाचा