ती बालके गणितात कच्ची

WD
सर्वसाधारणपणे नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाल्यानंतर मानवाचे अपत्य जन्माला येते. हा कालावधी काही दिवसांनी पुढे मागे होऊ शकतो; परंतु काही वेळा या कालावधीपेक्षा खूप आधी म्हणजे सातव्या, आठव्या महिन्यात जन्म होणार्‍या बालकांना अपुर्‍या दिवसांची बालके समजले जाते. अशा अर्भकांची जन्मानंतरही काही दिवस विशेष काळजी घ्यावी लागते. नंतर ही बालके सुदृढ झाली तरीही त्यांच्यात निर्माण होणार्‍या समस्या त्यांच्या प्रगतीशी संबंधित असू शकतात. अपुर्‍या दिवसांनी जन्माला आलेल्या बालकांची शैणक्षिक प्रगती चिंताजनक असू शकते. विशेषत: अशी बालके गणितात कच्ची असतात, असे संशोधकांना आढळले आहे.

नऊ महिने पूर्ण झालेल्या बाळांच्या तुलनेत सातव्या आठव्या महिन्यात जन्मलेल्या बालकांची अभ्यासातील प्रगती संथ असते. विशेषत: गणित हा विषय त्यांना अवघड जातो. तसेच अभ्यासाकडे लक्ष नसणे, उच्चारांमध्ये दोष असणे अशी लक्षणे दिसतात. असे मत युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या संशोधकांनी व्यक्त केले. अशी मुले शाळेत जाऊ लागल्यावर त्यांच्यातील हे दोष लक्षात येऊ लागतात. अशा मुलांची आकलन क्षमताही कमी असते. हा प्रकार कशामुळे होतो याचा अभ्यास शास्त्रज्ञ करीत आहेत. तसेच अपुर्‍या दिवसांच्या बालकांच्या मेंदूमध्ये असलेल्या बदलाचा अभ्यास केला जात आहे. त्यांच्या अभसात अशा मुलांच्या मेंदूतील श्वेत द्रव्यामध्ये खोलवर अनियमितता आढळली. सुरुवातीच्या काळात मेंदूमध्ये विस्तृत भागात पसरणार्‍या या दोषामुळे नंतरच्या काळात या मुलाच्या आकलनक्षमतेवर परिणाम होत असावा. असे त्यांना वाटत आहे. या संशोधनाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग करून या मुलांच्या वाढीच्या विविध टप्प्यांवर त्यांची कामगिरी सुधारण्यांसाठी करता येईल. असे त्यांना वाटत आहे. सध्या अशा मुलांची माहिती गोळा करणत येत आहे. तसेच मेंदूवर परिणाम झालेल्या भागाचे ‘एमआरआय’ स्कॅनिंग करून त्याचा अभ्यास केला जात आहे.

वेबदुनिया वर वाचा