युसुफ पठाण डोपिंग मध्ये दोषी : त्याचे झाले क्रिकेट मधून निलंबन

मंगळवार, 9 जानेवारी 2018 (15:37 IST)

इरफान पठाणचा भाऊ युसुफ पठाण हा डोपिंग टेस्ट मध्ये दोषी आढळला आहे. त्यामुळे त्याचे निलंबन करण्यात आले असून त्याला या काळात कोणत्याही क्रिकेट स्पर्धेत भाग घेता येणार नाही. या आगोदर युसुफ पठाण क्रिकेटपासून दूरू आहे त्यात हे नवीन संकट त्याने ओढवून घेतले आहे. विशेष म्हणजे दोघे भाऊ कोणतेही व्यसन करत नाहीत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.बडोद्याचा हा अष्टपैलू गेल्या वर्षी मार्च महिन्यात झालेल्या उत्तेजक चाचणीत दोषी आढळला होता. त्यामुळं या प्रकरणात त्याला पाच महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. या चाचणीत  टर्ब्युटॅलिन या निषिद्ध द्रव्याचं अजाणतेपणी सेवन केल्याचं आढळले आहे. विशेष म्हणजे  खोकल्याच्या औषधात टर्ब्युटॅलिनचा वापर करण्यात येतो. या प्रकरणात युसूफवर गेल्या वर्षीच्या १५ ऑगस्टपासून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्याचं निलंबन येत्या १४ जानेवारीपर्यंत कायम राहणार आहे. डोपिंगपासून वाचण्यासाठी प्रत्येक खेळातील संघटना आता खेळाडूंना जागरुक करण्याचा प्रयत्न करते. पण युसूफ पठाणनं खोकल्याचं औषध अजाणतेपणी घेतल्यानं त्याला या कारवाईला सामोरं जावं लागले आहे.  युसूफनं याबाबतची आपली बाजू मांडल्यानंतर बीसीसीआयनं त्याच्यावर केवळ पाच महिन्यांच्या बंदीची कारवाई केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती