मार्चमध्ये होणाऱ्या महिला प्रीमियर लीगसाठी मुंबई इंडियन्सने रविवारी प्रशिक्षक संघाची घोषणा केली. इंग्लंडच्या शार्लोट एडवर्ड्स यांना संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. स्टार भारतीय खेळाडू झुलन गोस्वामी मार्गदर्शक आणि गोलंदाजी प्रशिक्षक अशा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी अष्टपैलू देविका पळशीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी क्रिकेटपटू तृप्ती चंदगडकर भट्टाचार्य या संघाच्या व्यवस्थापक असतील.
नीता अंबानी म्हणाल्या, “एमआई वन फॅमेली मध्ये शार्लोट एडवर्ड्स, झुलन गोस्वामी आणि देविका पळशीकर यांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. त्या म्हणाल्या की अधिकाधिक महिला केवळ खेळाडू म्हणूनच नव्हे तर प्रशिक्षक, प्रशासक आणि सहाय्यक कर्मचारी म्हणूनही खेळात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत हे आश्चर्यकारक आहे.
मुंबई इंडियन्स हा इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात यशस्वी संघ आहे. समूहाने अलीकडेच 912.99 कोटी रुपयांना WPL साठी मुंबई महिला संघाची फ्रँचायझी विकत घेतली. महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम 4 मार्च ते 26 मार्च या कालावधीत होण्याची शक्यता आहे. यात मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, बेंगळुरू आणि लखनौ येथील संघ असतील.