वेस्ट इंडिजनेT20 विश्वचषक 2024 साठी आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला

शुक्रवार, 3 मे 2024 (21:06 IST)
ICC T20 विश्वचषक 2024 वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली 1 जूनपासून सुरू होणार आहे.या साठी वेस्टइंडीज ने आपल्या 15 सदस्ययीय संघाची घोषणा केली आहे. रोव्हमॅन पॉवेलची कर्णधार पदी निवड झाली आहे. तर संघात वेगवान गोलन्दाज शामार जोसेफचा समावेश करण्यात आला आहे. संघात शिमरान हेटमायर चे पुनरागमन झाले आहे. वेस्टइंडीज संघाला क गटात स्थान देण्यात आले आहे. हा संघ 2 जून रोजी पापुआ न्यू गिनी संघाविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.  

यासंघात ऑस्ट्रेलिया दौऱ्यात गाब्बा मैदानावर खेळल्या गेल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या विजयात चेंडूने महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या वेगवान गोलन्दाज शामर जोसेफचा प्रथमच या संघात समावेश करण्यात आला आहे. 
 
 विंडीजचा संघ टी-20 विश्वचषक2024 मध्ये पहिला सामना 2 जून रोजी पापुआ न्यू गिनीविरुद्ध खेळणार आहे, तर दुसरा सामना 9 जून रोजी युगांडाविरुद्ध, तर तिसरा आणि चौथा गट सामना 13 आणि 18 जून रोजी न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानविरुद्ध खेळला जाईल.
 
वेस्टइंडीज संघ -
रोव्हमन पॉवेल (कर्णधार), अल्झारी जोसेफ (उपकर्णधार), जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शे होप, अकिल हुसेन, शमर जोसेफ, ब्रेंडन किंग, गुडाकेश मोती, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड.
 
 Edited By- Priya Dixit   
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती