विश्वचषकातील सर्वात महत्त्वाच्या सामन्यांपैकी एक असलेला भारत-पाकिस्तान सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसी आणि बीसीसीआयशी सहमती दर्शवली आहे. विशेष म्हणजे याआधी दोन्ही संघांमधील हा सामना 15 ऑक्टोबरला होणार होता. मात्र, नवरात्रीचा पहिला दिवस असल्याने सामन्याची तारीख एक दिवस आधी बदलण्यात आली.
सुरक्षा यंत्रणांनी बीसीसीआयला उत्सवाच्या निमित्ताने तारीख बदलण्यास सांगितले होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सुरक्षा पथके व्यस्त राहणार असल्याने सामन्यासाठी सुरक्षा व्यवस्था राखणे कठीण जाईल, असा युक्तिवाद एजन्सींनी केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) लवकरच याबाबत अपडेटेड वेळापत्रक जारी करू शकते.
विश्वचषकाचे सामने भारतातील 10 शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता येथे सामने होणार आहेत. हैदराबाद व्यतिरिक्त, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरममध्ये 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान सराव सामने होणार आहेत. या विश्वचषकात एकूण 10 संघ सहभागी होत आहेत. मुंबई आणि कोलकाता येथे सामने आहेत.