15 कुत्री विराटने घेतली दत्तक

बंगळुरू- मैदानाबाहेरील एका कामगिरीसाठी सध्या विराट कोहलीचे कौतुक होत असून मैदानावर आक्रमक असलेला विराट कोहली मैदानाबाहेर पशु पक्ष्यांच्याबाबतीत तेवढाच हळवा आहे. आपल्याला भूतदया, प्राणीप्रेम म्हटले की घरी पाळलेली, गोंडस मांजरे, कुत्री नजरेसमोर दिसतात. विराटने मात्र खरोखरच्या भूतदयेचे दर्शन घडवताना अपंगत्व आलेल्या १५ कुत्र्यांना दत्तक घेतले आहे.
 
सध्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे भारताचा कर्णधार विराट कोहली नेतृत्व करत आहे. बंगळुरूमध्ये या संघाचे होम ग्राऊंड आहे. बंगळुरूमध्ये असताना वेळात वेळ काढून विराटने चार्ली अॅनिमल रेस्क्यू सेंटरला (केअर) भेट दिली. केंद्राच्या विश्वस्थ सुधा नारायणन या कोहलीच्या या भेटीची माहिती देताना म्हणाल्या, विराट आमच्या संस्थेला भेट देईल याची कल्पना नव्हती. आम्हाला केवळ व्हीआयपी भेटीबाबत माहिती देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात विराटची भेट आम्हाला आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. ही भेट १० मिनिटांची होती. पण विराट जवळपास ४५ मिनिटे येथे थांबला.
 
येथील प्राण्यांची विराट खूप आस्थेने विचारपूस करत होता. त्याने आमच्या संपूर्ण केंद्राचा फेरफटका मारला. येथे प्राण्यांना कसे आणले जाते. त्यांचे पुनर्वसन कसे होते. हे सेंटर ट्रॉमा केअर युनिट कसे चालवते वगैरेचीं माहिती त्याने घेतली., असे हे केंद्र चालवणाऱ्या नारायणन यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा