यामुळे हार्दिकला गोलंदाजी न देण्याचा निर्णय

शनिवार, 27 मार्च 2021 (10:42 IST)
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाने दिलेले ३३७ धावांचे आव्हान स्वीकारत इंग्लंडने केवळ चार विकेट गमावून ३९ चेंडू राखून पार केले. या विजयाचा श्रेट जॉनी बेअरस्टोच्या शानदार शतकासह बेन स्टोक्स आणि जेसन रॉयच्या आक्रमक अर्धशतका जात असला तरी या सामन्यात हार्दिक पांड्या गोलंदाजी देण्यात का आली नाही हा प्रश्न चाहत्यांना पडला.
 
कर्णधार विराट कोहलीने सहावा गोलंदाज म्हणून हार्दिक पांड्याला संधी न देण्यामागील कारण सांगताना म्हटले की भारतीय संघाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे हा निर्णय घेतला गेला. विराटने सांगितलं हार्दिक संघातील मह्त्त्वाचा भाग असून त्याच्या फिटनेसची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. टी-२० मालिकेत त्याच्या गोलंदाजीचा वापर केला गेला. बघायलं गेलं तर हे वर्कलोड मॅनेजमेंट आहे. त्याच्या गोलंदाजीतील कौशल्याची गरज कुठे आहे हे समजणे आवश्यक आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती