कोहलीची चेंडूवर नाराजी

तिसर्‍या कसोटीत वापरण्यात आलेल्या चेंडूबद्दल भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली. शेवटच्या दिवशी भारतीय आक्रमणाचा समर्थपणे मुकाबला करीत ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळविले.
 
खेळपट्टीकडून अपेक्षित साथ मिळाली नसली तरी चेंडूच्या स्थितीमुळे आम्हाला यश मिळाले नाही. चेंडू अपेक्षेइतका टणक नसल्याने खेळपट्टीवर पडल्यानंतर तो फारसा उसळत नव्हता. चेंडू बदलण्यात आला तेव्हाही तो अपेक्षित दर्जाचा नव्हता. चेंडूमध्ये पुरेसा टणकपणा नसेल तर गोलंदाजांना विकेटकडून अपेक्षा वेग मिळू शकत नाही. असे मला वाटते. टणक चेंडू असता तर निकालात निश्चितच फरक पडला असता.

वेबदुनिया वर वाचा