विराट चक्क बनला वॉटर बॉय

शनिवार, 25 मार्च 2017 (15:50 IST)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या धरमशाला कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे खेळू शकलेला नाही. मात्र तरीही टीम इंडियासाठी कोहली संघातील खेळाडू म्हणून नव्हे तर चक्क वॉटर बॉय म्हणून मैदानात उतरला. एखाद्या सामन्यात खेळत नसताना कर्णधाराने मैदानात जाऊन खेळाडूंना पाणी देण्याचा  दुर्मिळातील दुर्मिळ असा क्षण यावेळी आला. उमेश यादवने सलामीवीर मॅट रेनशॉला माघारी धाडलं, त्यावेळी मैदानातील भारतीय खेळाडूंना स्वत: कोहली पाणी घेऊन गेला. 

वेबदुनिया वर वाचा