भारताच्या दोन विश्वचषक विजयात मोलाचा वाटा उचलणारा दिग्गज अष्टपैलू युवराज सिंह निवृत्तीनंतर पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीसाठी पंजाबच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत युवराजचाही समावेश करण्यात आला आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेसाठी पंजाबने मंगळवारी संभाव्य 30 खेळाडूंची नावे जाहीर केली.