महिला अंडर-19 टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. या विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणारा भारत हा पहिला संघ आहे. आता विजेतेपदाच्या लढतीत भारताचा सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल. या सामन्यातील विजयासह भारतीय संघाला पहिला महिला अंडर-19 T20 विश्वचषक जिंकायचा आहे.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडची सुरुवात खूपच खराब झाली.
या विजयासह भारतीय मुलींनी पुरुष संघाकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला. न्यूझीलंडने नुकतेच हॉकी विश्वचषकाच्या करा किंवा मरोच्या सामन्यात भारताचा पराभव करून भारताला विश्वचषकातून बाहेर फेकले होते. आता भारतीय मुलींनी न्यूझीलंडला विश्वचषकातून बाद केले आहे. याशिवाय न्यूझीलंड संघाने 2021 टी-20 विश्वचषक आणि कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही भारताचा पराभव केला होता.