भारत आणि श्रीलंका यांच्यातील अंडर-19 आशिया कप (ACC U19 Asia Cup 2021) चा अंतिम सामना शुक्रवारी येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या श्रीलंकेला पावसाने ग्रासलेल्या या विजेतेपदाच्या सामन्यात 38 षटकांत 9 गडी गमावून 106 धावाच करता आल्या. डकवर्थ लुईस नियमानुसार (DLS) भारताला सामना जिंकण्यासाठी आता 102 धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले आहे. पावसामुळे षटकांची संख्या कमी करून ती 38-38 षटकांची करण्यात आली आहे. लक्ष्याला प्रत्युत्तर देताना भारताच्या डावाची सुरुवात झाली आहे.ए रघुवंशी आणि शेख रशीद ही जोडी क्रीझवर आहे. हरनूर सिंग पाच धावा करून बाद झाला. अंडर-19 आशिया कपच्या मागील 8 आवृत्त्यांमध्ये, भारताने ही स्पर्धा 7 वेळा जिंकली आहे. 2012 मध्येच त्याला संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. अंडर-19 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत एकदाही पराभूत झालेला नाही.