Tushar Deshpande Wedding : सीएसकेचा वेगवान गोलंदाज तुषार ने नभाशी लग्नगाठ बांधली

शुक्रवार, 22 डिसेंबर 2023 (18:10 IST)
Photo-Social Media
Tushar Deshpande Wedding :प्रेमात पडणं सोपं असतं असं म्हणतात, पण हे प्रेम टिकवणं प्रत्येकाच्याच जमत नाही. ज्या लोकांना या जगात खरे प्रेम मिळते ते भाग्यवान मानले जातात. क्रिकेटच्या विश्वात देखील असे काही जोडपे आहे ज्यांनी खऱ्या प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा आदर्श ठेवला आहे. सचिन तेंडुलकर -अंजली , विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे मोठे उदाहरण आहे. नुकतेच या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे विवाहबंधनात अडकला आहे. त्याने त्याची मैत्रीण नभा गड्डमवारशी लग्न केले, ज्याचे फोटो त्याने स्वतः पोस्ट केले आणि शेअर केले.

सीएसकेचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे फोटो शेअर करताना कॅप्शन लिहिले की, 'नवीन सुरुवात करण्यासाठी, दोन हृदये भेटली आहेत.'
आदल्या दिवशी म्हणजे 21 डिसेंबर 2023 रोजी तुषार आणि नभाने लग्न केले. CSK ने IPL 2023 चे विजेतेपद जिंकल्यानंतर 12 जून रोजी दोघांनी एंगेजमेंट केली.आयपीएल 2024 मध्ये तो सीएसकेकडून खेळताना दिसणार आहे.

तुषार देशपांडेने नभाशी लग्न केले आहे. नभा हे व्यवसायाने चित्रकला आणि हस्तकला कलाकार आहेत. विशेष म्हणजे नभा आणि तुषार एकमेकांना शाळेपासून ओळखतात. तिला माझ्या शाळेतील क्रशपासून माझ्या मंगेतरापर्यंत बढती मिळाली आहे.असं तुषार म्हणतो. 

तुषार देशपांडेने 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी 5 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 3 विकेट घेतल्या. यानंतर तो CSK संघात सामील झाला. आयपीएल 2023 मध्ये तुषारने 16 सामने खेळताना 21 विकेट घेतल्या होत्या.
 
 
 
Edited By- Priya DIxit   
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती