तत्पूर्वी, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना जास्त वेळ क्रीजवर टिकू दिले नाही. विंडीजचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला. भारताकडून रवी अश्विनने सर्वाधिक 5 बळी घेतले. तर तीन विकेट रवींद्र जडेजाच्या खात्यात गेल्या.
सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला,
'देशासाठी केलेली प्रत्येक धाव खास असते. पण मी सांगू इच्छितो की आमची गोलंदाजी अप्रतिम होती. त्यांना केवळ 150 धावांवर बाद केल्याने आमच्यासाठी गेम सेट झाला. या विकेटवर फलंदाजी करणे थोडे कठीण जाईल, हे आम्हाला माहीत होते. पण आम्ही ठाम राहिलो, आम्ही चांगली गोलंदाजी केली. या खेळपट्टीवर, आम्हाला माहित होते की आम्ही फक्त एकदाच, दीर्घकाळ फलंदाजी करू इच्छितो. आणि 400 ओलांडल्यावर आम्ही पुन्हा चांगली गोलंदाजी केली.
रोहितनेही जैस्वालचे कौतुक केले. तो म्हणाला,
'त्याच्याकडे प्रतिभा आहे. आम्हाला त्याची माहिती होती. आपण मोठ्या मंचासाठी सज्ज असल्याचे त्याने गेल्या काही वर्षांत दाखवून दिले आहे. त्याने संयम दाखवला. त्याच्या स्वभावाचीही कसोटी लागली. कोणत्याही क्षणी तो घाबरला आहे असे वाटले नाही. मला फक्त त्याला आठवण करून द्यायची होती - तू इथे येण्यास पात्र आहेस. माझे काम फक्त त्याला सांगायचे होते की त्याने खूप मेहनत केली आहे आणि त्याला इथे फक्त मजा करायची आहे.