कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या निर्णयाबद्दल अँजेलो मॅथ्यूजने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, जूनमध्ये बांगलादेशविरुद्धचा कसोटी सामना हा या फॉरमॅटमधील त्याचा शेवटचा सामना असेल. मी या फॉरमॅटला अलविदा करत असलो तरी, निवडकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर, संघाला जेव्हा जेव्हा माझी गरज असेल तेव्हा मी मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध असेन. मला वाटते की सध्या आमच्या कसोटी संघात अनुभवी आणि तरुण दोन्ही खेळाडू आहेत आणि नवीन तरुण खेळाडूंना चमक दाखवण्याची ही एक चांगली संधी आहे.