या चॅम्पियन खेळाडूची बीसीसीआय अध्यक्ष म्हणून निवड होऊ शकते

शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022 (22:22 IST)
BCCI President: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) नवीन अध्यक्षाबाबत लवकरच घोषणा केली जाऊ शकते. गुरुवारी मंडळाच्या अनेक वरिष्ठांनी दोन महत्त्वाच्या बैठका घेतल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन, कोषाध्यक्ष अरुण धुमल, आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्यासह अनेक बडे अधिकारी दिल्लीत झालेल्या बैठकीत सहभागी झाले होते.
 
वृत्तसंस्था एएनआयच्या मते, 1983 चा विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाचे सदस्य असलेले माजी दिग्गज क्रिकेटर रॉजर बिन्नी गांगुलीच्या जागी बीसीसीआयचे अध्यक्ष बनू शकतात. या शर्यतीत ते सध्या आघाडीवर आहे. यावर लवकरच अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता सूत्रांनी एएनआयला दिली. 
 
गांगुली यांनी 23 ऑक्टोबर 2019 रोजी बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारले.तर जय शाह 24 ऑक्टोबर 2019 रोजी बीसीसीआयचे सचिव झाले. दोघांचा कार्यकाळ ऑक्टोबर 2022 मध्ये संपेल.
 
Edited By- Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती