भारताच्या एक शाळेतील विद्यार्थ्याने क्रिकेटमध्ये अप्रतीम असे प्रदर्शन घडवत संपूर्ण देशाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. गाझियाबाद येथील या विद्यार्थ्याने शहीद राम प्रसाद विस्मिल स्मृती क्रिकेट सामन्यात तब्बल ५८५ केल्या. विशेष म्हणजे त्याने आपल्या खेळी दरम्यान ५५ चौकार आणि ५२ षटकार १६७ चेंडूत केल्या आहेत. स्वास्तिक चिकारा असं या विद्यार्थ्याचे नाव आहे.