सौरव गांगुलीची कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह

रविवार, 26 जुलै 2020 (19:31 IST)
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याचा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. सौरव गांगुलीचा भाऊ स्नेहाशिष याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून गांगुलीने स्वतःला होम क्वारंटाइन केलं होतं. यानंतर सौरव गांगुलीचीही करोना चाचणी करण्यात आली होती, ज्या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.
 
“सौरव सध्या आपल्या आईसोबत राहतो आहे. त्याच्या आईची तब्येत वयोमानानुसार खराब होत असते. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सौरवने कोरोना चाचणी केली होती. ज्या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.” गांगुलीच्या घरातील जवळच्या व्यक्तीने पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली. सौरव गांगुलीचा भाऊ स्नेहाशिषवरही रुग्णालयात उपचार सुरु असून त्याच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. लवकरच त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचं कळतंय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती