T20 विश्वचषकाचा 15 वा सामना श्रीलंका आणि आयर्लंड यांच्यात खेळला जात आहे. रविवारी (23 ऑक्टोबर) होबार्टमध्ये आयर्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयर्लंडची सुरुवात खराब झाली आहे. पॉवरप्लेमध्ये दोन गडी गमावल्यानंतर संघ संघर्ष करत आहे. पहिल्या सहा षटकांत आयर्लंडला केवळ 40 धावा करता आल्या आणि पॉवरप्लेचा फायदा घेता आला नाही. कर्णधार बलबर्नी 1 धावा आणि टकर 10 धावांवर बाद झाले. लाहिरू कुमारा आणि महेश टीक्षाना यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
आयर्लंड : पॉल स्टर्लिंग, अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्पर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क अडायर, सिमी सिंग, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल.
श्रीलंका: कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजया डी सिल्वा, चरित अस्लंका, अशेन बंदारा, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (क), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षना, बिनुरा फर्नांडो, लाहिरू कुमारा.