एकदिवसीय सामन्यात द्विशतक करणारा जगातील सर्वात तरुण फलंदाज शुभमन गिल

रविवार, 8 सप्टेंबर 2024 (16:36 IST)
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज शुभमन गिल 8 सप्टेंबर रोजी आपला 25 वा वाढदिवस साजरा करत आहे. फार कमी वेळात शुभमन गिलने भारतीय क्रिकेटमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे आणि क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये तो टीम इंडियाचा नियमित खेळाडू बनला आहे.

गिल सध्या भारतीय टी-20 आणि एकदिवसीय संघाचा उपकर्णधार आहे.शुभमन गिलने IPL 2024 मध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्वही केले होते. 
 
शुभमन गिल जागतिक क्रिकेटमध्ये एकदिवसीय फॉर्मेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो सध्या जगातील सर्वात तरुण फलंदाज ठरला. शुभमन गिलने 19 जानेवारी 2023 रोजी त्याचा सहकारी इशान किशनचा विक्रम मोडला.
 
शुभमन गिलने 18 जानेवारी 2023 रोजी न्यूझीलंडविरुद्ध त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील द्विशतक झळकावले आणि 208 धावांची खेळी खेळली. वयाच्या 23 वर्षे 132 दिवसात त्याने हा पराक्रम केला आणि इशान किशनचा विक्रम मोडला.त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती