सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त सेहवागने केलेल्या ट्विट्सची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. हटा सावन की घटा, आज किसका बर्थ डे है, सबको है पता असे म्हणत सेहवागने सलमान खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देण्यासाठी विरूने जो फोटो निवडला आहे तो देखील खास त्याच्याच शैलीतील आहे.
तसेच अलीकडेच दंगल चित्रपट पाहिल्यानंतर सेहवागने आमीर खानचे अगदी वेगळ्या शैलीत अभिनंदन केले. हा चित्रपट पाहताना आपण भावूक झालो होतो असे सांगण्याऐवजी सेहवाग म्हणाला, या चित्रपटांच्या तिकिटांबरोबर टिश्यू पेपरचीही व्यवस्था करावी.