चेन्नईच्या फलंदाजांनी पुन्हा निराशा केली.
पंजाब किंग्जच्या २१९ धावांच्या प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जला ५ गडी गमावून फक्त २०१ धावा करता आल्या. तसेच चेन्नईला हरवून पंजाबने तिसरा विजय मिळवला आणि या हंगामात पहिल्यांदाच घरच्या मैदानावर विजयाची चव चाखली. सीएसकेवरील या विजयासह, पंजाबचे ६ गुण झाले आहे आणि ते पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे.