टी 20 वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानचा अमेरिकेकडून पराभव

शुक्रवार, 7 जून 2024 (09:17 IST)
T20 विश्वचषकातील पहिला मोठा उलटफेर झाला आहे. अमेरिकेत सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकाच्या अ गटातील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला नवख्या अमेरिकेकडून पराभव स्वीकारावा लागला आहे.
अत्यंत अटीतटीच्या सामन्यात यजमान अमेरिकेच्या संघाने पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला.
क्सासमधील डॅलस येथील ग्रँड प्रायरी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. गुरुवारी(6जून)रोजी  खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक हारून पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना सात गड्यांच्या मोबदल्यात 159 धावा केल्या होत्या.
 
प्रत्युत्तरात अमेरिकेने 20 षटकांत 3 विकेट गमावून 159 धावा केल्या, त्यानंतर सामना बरोबरीत सुटला.
यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आली, ज्यामध्ये अमेरिकेने 18 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ केवळ 13 धावा करू शकला.पाकिस्तानने 20 षटकांत सात गडी गमावून 159 धावा केल्या होत्या.

कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 44 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अमेरिकेच्या संघाला 20 षटकांत तीन गडी गमावून 159 धावा करता आल्या. कर्णधार मोनांक पटेलने सर्वाधिक 50 धावा केल्या. यानंतर सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. मोनांकला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. 
 
या विजयासह अमेरिकेने अ गटात गुणतालिकेत भारताला मागे टाकले असून ते पहिल्या क्रमांकावर आले आहेत.याशिवाय पाकिस्तान तिसऱ्या, कॅनडा चौथ्या आणि आर्यलंड पाचव्या स्थानावर आहे.
अमेरिकन संघासाठी हा विजय ऐतिहासिक असून पाकिस्तानसारख्या तुल्यबळ संघाचा पराभव करून अमेरिकेने त्यांच्या स्पर्धेची दमदार सुरुवात केली आहे.
 
पाकिस्तानचा पुढील सामना 9 जून रोजी भारताविरुद्ध आहे. त्याचबरोबर अमेरिकेचा संघ आता 12 जूनला भारताशी भिडणार आहे.
 
Edited by - Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती