होय मला मुरलीधरनची भीती वाटायची: सेहवाग

भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने स्वत:चे एक रहस्य उघड केले आहे. सेहवाग फलंदाजी करायचा तेव्हा भल्याभल्या अनेक गोलंदाजांना धडकी भरायची, परंतू फलंदाजी करताना मलाही एका गोलंदाजाची भीती वाटत होती याबाबतचे गुपित सेहवागने उघड केले आहे.
 
माझ्या 14 वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत मला श्रीलंकेचा माजी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनची भीती वाटायची, असे सेहवागने कबूल केले. मुरलीधरनचा अचूक टप्पा आणि गोलंदाजी शैलीमुळे त्याच्या गोलंदाजीवर खेळणे अवघड होते, असे सेहवागने सांगितले.
 
क्रिकेट कारकिर्दीत सेहवाग आणि मुरलीधरन यांचा अनेकदा सामना झाला. मुरलीधरनने तीनवेळा सेहवागला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मात्र सेहवागने 2008 च्या श्रीलंका दौर्‍यात मुरलीधरन आणि अंजता मेडिस यांच्या गोलंदाजीवर चांगलाच प्रहार केला होता.

वेबदुनिया वर वाचा