चॅम्पियन्स ट्रॉफी2025 मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नझमुल हसन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला. बांगलादेशने फक्त 35 धावांत पाच विकेट गमावल्या. या सामन्यात शमीने शानदार गोलंदाजी केली आहे आणि एक खास विक्रम रचला आहे.
मोहम्मद शमीने नेहमीच आयसीसी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि त्याची झलक आपल्याला 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात दिसली आहे. आता बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात तीन विकेट्स घेत त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. तो एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी चेंडूत 200 बळी घेणारा गोलंदाज बनला आहे आणि त्याने मिशेल स्टार्कचा विश्वविक्रम मोडला आहे.
मोहम्मद शमीने त्याच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये 104 सामन्यांमध्ये 200विकेट्स घेतल्या आहेत. तो सर्वात कमी सामन्यांमध्ये 200 बळी घेणारा संयुक्त दुसरा गोलंदाज ठरला. त्याने सकलेन मुश्ताकची बरोबरी केली आहे. या दोन्ही गोलंदाजांनी 104-104 सामन्यांमध्ये 200 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. तर मिचेल स्टार्क पहिल्या क्रमांकावर आहे. स्टार्कने 102 सामन्यांमध्ये 200 विकेट्स घेतल्या.
मोहम्मद शमीची गणना भारताच्या सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये केली जाते. त्याने 2013 मध्ये टीम इंडियासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर, आतापर्यंत त्याने 104 एकदिवसीय सामन्यांमध्ये 201 विकेट्स घेतल्या आहेत.