भारतीय संघ न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभव विसरून इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत नवी सुरुवात करेल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ बुधवारी पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडशी भिडणार आहे. या सामन्यासह अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी 14 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामने खेळले जातील.एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये चार सामन्यांमधून बाहेर असूनही, शमी भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता, त्याने 24 बळी घेतले. वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत त्याने 57 धावांत सात विकेट घेतल्या. त्याने टी-20 क्रिकेटमध्ये एकूण 24 विकेट्स घेतल्या आहेत
पहिल्या T20 सामन्यासाठी भारत आणि इंग्लंडचे संघ पुढीलप्रमाणे आहेत...
भारताचे संभाव्य प्लेइंग-11: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी , अक्षर पटेल (उपकर्णधार), अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती.
इंग्लंडचे घोषित प्लेइंग-11: बेन डकेट, फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक (उपकर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड.