कैफला अजूनही वाटते की धोनी आजही तिनही फॉर्मेटमध्ये खेळू शकतो. झारखंडने छत्तीसगडवर विजय मिळवल्यानंतर छत्तीसगडचा कर्णधार कैफ म्हणाला की धोनीकडे नैसर्गिक गुणवत्ता आहे. जे तुम्हीही आजयर्पंत पाहत आला आहात. माझे मत आहे की वनडे टी-20 आणि कसोटीत आजही धोनी खेळू शकतो. तो आजही प्रत्येक चेंडूवर जोरदार फटका मारू शकतो. कैफ पुढे असेही म्हणाला की मी धोनीला त्याच्या पदार्पणातील सामन्यापासून पाहात आलो आहे.