मुंबई आणि सीएसके यांच्यातील आयपीएल 2025 चा सामना रविवार, 20 एप्रिल रोजीमुंबईतील वानखेडे स्टेडियमवरभारतीय वेळेनुसार संध्याकाळी7:30 वाजता सुरू होईल. टॉस त्याच्या अर्धा तास आधी, म्हणजे संध्याकाळी 7 वाजता होईल.
सुरुवातीच्या सामन्यांतील निराशेनंतर मुंबईने शेवटच्या दोन सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादला हरवून चांगले पुनरागमन केले आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे आणि चालू हंगामात विजयाची हॅटट्रिक नोंदवण्याचा आणि हंगामातील पहिल्या सामन्यात या संघाकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. त्यांच्या शेवटच्या सामन्यात, मुंबई इंडियन्सने त्यांच्या शानदार गोलंदाजीने सनरायझर्स हैदराबादच्या आक्रमक फलंदाजीला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. त्यानंतर संघाने सहा विकेट्स गमावून विजयासाठी 163 धावांचे लक्ष्य सहज गाठले.
चेन्नईने गेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध पाच विकेटने विजय मिळवून सलग पाच पराभवांची मालिका संपवली, परंतु फलंदाजी त्यांचा कमकुवत दुवा राहिला आहे. नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीमुळे महेंद्रसिंग धोनी कर्णधार म्हणून परतला आहे अनुभवी जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनामुळे मुंबईची गोलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. ट्रेंट बोल्ट देखील त्याच्या जुन्या शैलीत दिसत आहे.
सामन्यासाठी दोन्ही संघांचे प्लेइंग-11
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, रायन रिकलटन (यष्टीरक्षक), विल जॅक्स, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिशेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.
चेन्नई सुपर किंग्ज : शेख रशीद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), जेमी ओव्हरटन, मथिशा पाथिराना, खलील अहमद, अंशुल कंबोज.