दरम्यान, सामन्याच्या अखेच्या दिवशी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला संघाला चिअर अप करण्यासाठी आला होता. खुद्द बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया पेजवरून ही माहिती दिली. तसेच धोनीचा फोटो शेअर करताना पाहा सामना पाहयला कोण आले आहे? असे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून विजय हजारे चषक स्पर्धा सुरू असल्याने धोनी सामना पाहण्यासाठी हजर राहू शकला नव्हता. मात्र, शनिवारी सेमीफायनलमध्ये बंगालविरूद्ध झारखंडचा पराभव झाल्याने धोनीचा संघ स्पर्धेबाहेर झाला.