आद्यापही या खेळात शहरी व ठरावीक शहरातीलच खेळाडू दिसतात मात्र फक्र शहरातील लोक तेथे येतात मात्र ग्रामीण मुले मुली नाहीत ,यामुळे हा खेळ दुर्लक्षीत शहरांसह गावागावात पोहचणे आवश्यक असल्याचे मत भातीय संघाचे माजी खेळाडू किरण मोरे यांनी येथे व्यक्त केले आहे.
पत्रकारांशी बोलताना मोरे म्हणाले, नाशिकचे मैदान व खेळपट्टी आंतरराष्ट्रीय दर्जाचे झाले आहे. आता या ठिकाणी अधिक सुविधा वाढवून एकदिवसीय सामने घेण्यास हरकत नाही. येथील खेळपट्टी आतापर्यंत फलंदाजीसाठी उपयुक्त असल्याचा इतिहास आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वपुर्णे असल्याने विजयाच्या इराद्यानेच दोन्ही संघ उतरले आहेत. रणजी स्पर्धेकडे प्रेक्षक फारसे लक्ष देत नाहीत. मात्र नाशिकला भरलेले स्टेडियम हे खेळाडूंचा उत्साह वाढवणारे आहे. असे वातावरण क्रिकेटसाठी चांगले समजले जाते असे मत मोरे यांनी व्यक्त केले.