भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची विकेट ही ऑस्ट्रेलियाच्या विजयासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असेल, अशी प्रांजळ कबुली यजमान संघाचा आघाडीचा गोलंदाज पॅट कमिन्सने दिली आहे.विराटची विकेट खूप मोठी विकेट आहे. त्यामुळे त्याला शांत ठेवणे हाच आमच्या विजयाचा मंत्र असेल, असेही तो पुढे म्हणाला.
कमिन्सने पुढे सांगितले की, प्रत्येक संघामध्ये एक किंवा दोन असे फलंदाज असतात की त्यांची विकेट मिळवणे प्रतिस्पर्धी गोलंदाजाचे लक्ष्य असते. यात बहुदा संघाच्या कर्णधारांचा समावेश असतो. जसे की इंग्लंडचा जो रुट, न्यूझीलंडचा केन विलियम्सन आणि भारताचा विराट. तुम्ही या फलंदाजांना लवकर बाद केले तर सामना जिंकू शकता.