इंग्लंडचा फलंदाज जो रूट रविवारीआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17,000 धावा पूर्ण करणारा पहिला इंग्लिश खेळाडू ठरला. न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यादरम्यान रूटने ही कामगिरी केली. त्याने शानदार शतक झळकावून आपल्या संघाला विजयाकडे नेले. रूटने 170 चेंडूत नाबाद 115 धावा केल्या. त्याच्या शतकाच्या जोरावर इंग्लंड संघ 2015 नंतर प्रथमच न्यूझीलंडला पराभूत करण्यात यशस्वी ठरला.
इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुक हा 10,000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा दुसरा इंग्लिश खेळाडू आहे. त्याने 161 कसोटीत 45.35 च्या सरासरीने 12,472 धावा केल्या आहेत. त्याने खेळाच्या सर्वात प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये 33 शतके आणि 57 अर्धशतकेही केली आहेत. सचिन तेंडुलकर (15,921), रिकी पाँटिंग (13,378), जॅक कॅलिस (13,289), राहुल द्रविड (13,288) आणि अॅलिस्टर कुक (12,472) 10,000 किंवा त्याहून अधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत.