IPL Auction 2021: जूही चावलाने आर्यन आणि जान्हवीचा फोटो शेअर केला, खास संदेश लिहिला

शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (10:47 IST)
Twitter
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 14 व्या मोसमातील खेळाडूंचा लिलाव 18 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे झाला. यावर्षी एप्रिलमध्ये आयपीएल खेळला जाणार असून या लिलावात काही दिग्गज क्रिकेटपटूंवर जोरदार धनवर्षा झाली. आयपीएलच्या लिलावात प्रथमच चार खेळाडूंना 14 किंवा 14+ कोटी रुपयांना विकत घेण्यात आले. ख्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महाग खेळाडू ठरला. शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यनसुद्धा या आयपीएलच्या लिलावात प्रथमच दिसला. शाहरुख आणि जूही चावला कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) फ्रँचायझी संघाचे सह-मालक आहेत. यापूर्वी जूही  चावला हिची मुलगी जान्हवी मेहतासुद्धा या लिलावात सहभागी झाली होती, तर आर्यनला पहिला अनुभव होता.
 
या दोघांचे फोटो शेअर करताना जूही चावलाने लिहिले की, 'केकेआरची दोन्ही मुले पाहून खूप आनंद झाला. लिलाव टेबलवर आर्यन आणि जाह्नवी. '
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती