IPL Auction: पॅट कमिन्सला मिळणार 15.50 कोटी ; KKRकडे
गुरूवार, 19 डिसेंबर 2019 (17:09 IST)
इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या 13व्या हंगामासाठी लिलाव कोलकाता इथं सुरू झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने फास्ट बॉलर पॅट कमिन्ससाठी तब्बल 15.50 कोटींची बोली लावत त्याला संघात समाविष्ट केलं.
पॅट कमिन्स आयसीसी टेस्ट रेटिंगमध्ये अव्वल स्थानी आहे. वनडे रेटिंगमध्ये कमिन्स चौथ्या स्थानी आहे. गेल्या वर्षभरात कमिन्सच्या दमदार प्रदर्शनाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने महत्त्वपूर्ण विजय मिळवले आहेत.
किंग्ज इलेव्हन पंजाबने ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेलला 10.75 कोटी रुपये देऊन विकत घेतलं. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने ख्रिस मॉरिससाठी 10 कोटी रुपयांची बोली लावत विकत घेतलं.
दिल्ली कॅपिटल्स संघाने ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर अॅलेक्स कारेला 2.4 कोटी रुपये देऊन संघात समाविष्ट केलं. कारेने यंदा झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत आपल्या बॅटिंग आणि कीपिंगने सर्वांना प्रभावित केलं होतं.
डावखुरा बॉलर जयदेव उनाडकतला राजस्थान रॉयल्सला पुन्हा ताफ्यात घेतलं. जयदेवसाठी राजस्थानने 3 कोटी रुपये मोजले.
मुंबई इंडियन्सने धडाकेबाज बॅट्समन ख्रिस लिनला 2 कोटी रुपयांना विकत घेतलं.
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक बॅट्समन आरोन फिंचसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुने 4.4 कोटी रुपये खर्च केले. आरोन फिंचचा हा आठवा संघ आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयोन मॉर्गनला 5.25 कोटी रुपये खर्च करून ताफ्यात समाविष्ट केलं.
राजस्थान रॉयल्सने रॉबिन उथप्पासाठी 3 कोटी रुपये खर्च केले.
जेसन रॉयला 1.5 कोटींना दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतलं.
चेतेश्वर पुजारा, युसुफ पठाण, स्टुअर्ट बिन्नी, कॉलिन डी ग्रँडहोम यांना लिलावाच्या पहिल्या टप्प्यात कोणीही विकत घेतलं नाही.