विश्वचषकादरम्यानच शमीला दुखापत झाली होती. दुखापतग्रस्त घोट्याने तो वर्ल्ड कपमध्ये खेळला होता. त्या स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी केली आणि सात सामन्यांत 24 बळी घेतले. तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. मात्र, त्यानंतर तो सतत क्रिकेट ॲक्शनपासून दूर आहे. आता त्याच्या दुखापतीवर योग्य उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा स्थितीत शमीला सावरण्यासाठी अनेक महिने लागू शकतात. आयपीएलनंतर लगेचच टी-20 विश्वचषक होणार आहे आणि आता त्यात शमीच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.
2023 मध्ये शमीने 17 सामन्यात 28 विकेट घेतल्या होत्या. गेल्या मोसमात तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. शमीच्या गैरहजेरीमुळे गुजरातला यंदा खूप त्रास सहन करावा लागणार आहे. या हंगामात संघाचे दोन सर्वात अनुभवी खेळाडू त्यांच्यासोबत नसतील. हार्दिकच्या जागी शुभमन गिलची या मोसमासाठी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचवेळी, टीम लवकरच शमीच्या बदलीची घोषणा करू शकते.