सचिन केवळ क्रिकेट खेळण्यासाठीच जन्माला आला, इंझमामने केलं भरभरुन कौतुक

बुधवार, 26 फेब्रुवारी 2020 (13:11 IST)
पाकिस्तान क्रिकेट संघाचे दीर्घकाळ यशस्वी नेतृत्व करणार्‍या इंझमाम उल हक याने एक व्हिडीओ तयार केला असून त्यात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे भरभरुन कौतुक केले आहे. 
 
सचिनवर स्तुतिसुमने उधळत इंझमामने म्हटले की सचिन हा सर्वकालीन सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे. सचिन केवळ क्रिकेट खेळण्यासाठीच जन्माला आला असल्याचं त्याने म्हटले. क्रिकेट आणि सचिन हे दोघे एकमेकांसाठीच बनलेले आहेत. सचिनने वयाच्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्याने अतिशय धमाकेदार खेळी करून दाखवल्या. अशा प्रकारचा खेळ केवळ प्रतिभावंत खेळाडूलाच करता येऊ शकतो. जर सर्वोत्तमच्याही वरील कोणता दर्जा असेल तर सचिन त्या दर्जाचा खेळाडू आहे, अशा शब्दात इंझमामने सचिनचे कौतुक केले.
 
त्याने सचिनच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दौर्‍याबद्दल सांगतिले की तो दौरा पाकिस्तानचा होता आणि इतक्या कमी वयात सचिनसमोर वसिम अक्रम, वकार युनिस आणि इम्रान खान यांसारख्या वेगवान गोलंदाजांची फौज होती. पण सचिनने त्या गोलंदाजांचा सामना करत आपली फलंदाजीतील प्रतिभा जगाला दाखवून दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती