INDW vs BANW हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने मीरपूर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचा 108 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने मागील सामन्यातील पराभवाचा बदला घेतला. भारताच्या विजयात जेमिमा रॉड्रिग्जचे महत्त्वाचे योगदान होते. तिने प्रथम 86 धावांची खेळी खेळली आणि त्यानंतर शानदार गोलंदाजी करत 3 धावांत 4 बळी घेतले.