भारताची सलामीवीर स्मृती मंधाना हिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डे/नाईट कसोटीत शतक झळकावून इतिहास रचला आहे. दिवस/रात्र कसोटी सामन्यात शतक झळकावणारी ती भारतातील पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारी ती भारताची पहिली खेळाडू आहे. मंधानाचे हे पहिले कसोटी शतक आहे.