दोन्ही संघांमध्ये समान स्पर्धा असेल. बंगळुरू आणि राजस्थान यांच्यात एकूण 24 सामने झाले आहेत. यापैकी RCB ने 11 आणि RR ने 10 सामने जिंकले आहेत. तीन सामन्यांचा निकाल लागला नाही. बंगळुरूने गेल्या तीन सामन्यांमध्ये राजस्थानचा पराभव केला आहे. अशा स्थितीत राजस्थानसाठी हा सामना सोपा नसेल. यूएईमध्ये दोन्ही संघ दोन वेळा आमनेसामने आले आहेत. आरसीबीने दोन्ही सामने जिंकले आहेत. गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाला हैदराबादविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याचवेळी आरसीबीने मुंबई संघाविरुद्ध विजय मिळवला.
कर्णधार विराट कोहली सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावत आहे. त्याने मुंबईविरुद्ध सलग दुसरे अर्धशतक केले आणि ग्लेन मॅक्सवेलनेही 37 चेंडूत 56 धावा केल्या. कोहली आणि मॅक्सवेल समान गती कायम राखू इच्छितात. कोहलीसाठी सर्वात मोठी समस्या एबी डिव्हिलियर्सचा फॉर्म आहे. डिव्हिलियर्सला तीन सामन्यांमध्ये फक्त 0, 12,11 धावा करता आल्या आहेत.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन
राजस्थान रॉयल्स: एविन लुईस, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, महिपाल लोमर, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, चेतन साकरिया, जयदेव उनाडकट/श्रेयस गोपाल आणि मुस्तफिजूर रहमान.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू: विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पड्डीकल, श्रीकर भारत (wk), ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, शाहबाज अहमद/रजत पाटीदार, डॅनियल ख्रिश्चन, काइल जेमसन/दुशमंथ चमीरा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहल.