टी-20 विश्वचषकात भारताची विजयी सलामी, आयर्लंडला 8 विकेट राखून हरवलं

गुरूवार, 6 जून 2024 (09:29 IST)
पुरुषांच्या ट्वेन्टी20 विश्वचषकात भारतीय संघानं विजयी सलामी दिली, पण कर्णधार रोहित शर्माच्या दुखापतीमुळे काही काळ चाहत्यांना चिंतेत टाकलं.
 
अमेरिकेत न्यूयॉर्कच्या नासॉ कौंटी स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात भारतानं आयर्लंडला 8 विकेट्स आणि 46 चेंडू राखून हरवलं आणि गुणतालिकेत खातं उघडलं.
 
ग्रुप एच्या या सामन्यात आयर्लंडनं भारतासमोर विजयासाठी 97 रन्सचं माफक लक्ष्य ठेवलं होतं. भारतीय फलंदाजांनी अगदी आरामात त्याचा पाठलाग केला. अवघ्या सहा रन्समध्ये दोन विकेट्स काढणारा जसप्रीत बुमरा सामन्यात सर्वोत्तम खेळाडू ठरला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती