न्यूझीलंड दौर्‍यासाठी भारतीय संघाची घोषणा

बुधवार, 22 जानेवारी 2020 (15:55 IST)
न्यूझीलंड दौर्‍यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. बीसीसीआयकडून वनडे आणि टी-20 या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून वनडे सामन्यात मुंबईकर पृथ्वी शॉला संधी देण्यात आली आहे. दुखापतग्रस्त झालेल्या शिखर धवनच्या जागी पृथ्वी शॉला संधी मिळाली आहे. तर टी-20 च्या संघात शिखर धवनच जागी संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. न्यूझीलंड दौर्‍यावर असताना भारतीय संघ पाच सामन्यांची टी20 मालिका, तीन एकदिवसी सामन्यांची मालिका आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. टी20 मालिकेसाठी कर्णधारपद विराट कोहलीकडेच असून, रोहित शर्मा उपकर्णधार असेल. यष्टिरक्षणाची जबाबदारी ऋषभ पंतच्या खांद्यावर देण्यात आली आहे. 24 जानेवारी रोजी पहिला टी-20 सामना खेळवण्यात येणार आहे. 
 
वन डे साठी भारतीय संघ 
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिव दुबे, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, केदार जाधव. 
 
टी-20 साठी भारतीय संघ 
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), संजू सॅमसन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिव दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, नवदीप सैनी, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती