बीसीसीआयने अवयवदान करा, जीव वाचवा हा उपक्रम सुरु केला आहे. भारत आणि इंग्लंडमधील खेळाडू या उपक्रमाला पाठिंबा देत आहे. या उपक्रमाचे नेतृत्व आयसीसीचे अध्यक्ष जय शहा करत आहे. बीसीसीआयच्या 'अवयव दान करा, जीव वाचवा या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी दोन्ही संघाचे खेळाडू हातावर हिरव्या पट्ट्या घालून खेळत आहे.
"12 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान, अवयवदान करा, जीव वाचवा, हा जागरूकता उपक्रम सुरू करताना आम्हाला अभिमान वाटतो," असे शाह यांनी इंस्टाग्रामवर लिहिले.
खेळामध्ये मैदानाबाहेरही प्रेरणा देण्याची, एकत्र येण्याची आणि कायमस्वरूपी प्रभाव निर्माण करण्याची शक्ती असते. या उपक्रमाद्वारे आम्ही सर्वांना जीवनाची सर्वात मोठी देणगी देण्याच्या दिशेने एक पाऊल उचलण्याचे आवाहन करतो. एक संकल्प, एक निर्णय, अनेक लोकांचे प्राण वाचवू शकतो. चला एकत्र येऊया आणि फरक घडवूया! या उपक्रमाला विराटकोहली, शुभमन गिलसह अनेक खेळाडूंनी पाठिंबा दिला आहे.