महिला टी20 विश्वचषक 2024 यूएईमध्ये आयोजित करण्यात येणार आहे आणि आता त्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौरला संघाची कर्णधार बनवण्यात आली आहे. स्मृती मंधाना यांच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. युवा आणि अनुभवी खेळाडूंना संघात संधी मिळाली आहे. महिला टी-20 विश्वचषक 2024 पूर्वी बांगलादेशमध्ये होणार होता. मात्र राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने बांगलादेशऐवजी यूएईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
संघात दोन यष्टिरक्षकांना संधी देण्यात आली आहे. यस्तिका भाटिया आणि रिचा घोषचा समावेश आहे.आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात श्रेयंकाच्या बोटाला फ्रॅक्चर झाले होते आणि त्यामुळे ती आशिया कपमधून बाहेर पडली होती. दुसरीकडे, यास्तिकाचा बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. पण पहिल्याच सामन्यात तिला दुखापत झाली. आता श्रेयंका आणि यस्तिका 2024 च्या टी-20 विश्वचषकात खेळतील की नाही हे त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असेल.
भारतीय संघाच्या फलंदाजीचा भार हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, शेफाली वर्मा आणि जेमिमाह रॉड्रिग्ज यांच्यावर असेल.
भारत विरुद्ध पाकिस्तान - 6 ऑक्टोबर
भारत विरुद्ध श्रीलंका - 9 ऑक्टोबर
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - 13 ऑक्टोबर
ICC महिला T20 विश्वचषक 2024 साठी भारताचा संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधांना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, ऋचा घोष (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, श्रेयंका पाटील, अरविंद पाटील. रेड्डी.